हिरव्या मुगाचे पौष्टिक सुप
एक वाटी भिजलेले मुग कुकर मध्ये दोन कप पाणी घालून वाफवून घ्यावेत, गार झाल्यावर त्यातले 2-3 चमचे मुग बाजुला काढून बाकीचे मिक्सर मध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यावी, मग एका पॅन मध्ये अर्धा चमचा तेल टाकून गरम करावे व त्यात अर्धा चमचा जिरे घालावे, जिरे तडतडले का त्यात मुगाची वाटलेली पेस्ट घालून थोडे  पाणी घालावे,  बाजूला काढून ठेवलेले मुग  घालावे आणि ऊकळी आली का त्यात चवीनुसार मीठ, चवीनुसार मिरपूड, एका लिंबाचा रस, 1/4 चमचा हिंग घालून 2-3 मिनिटे ऊकलावे.
गरमा गरम बाऊल मध्ये काढून  अर्धा चमचा बटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करावे.

Comments

Popular posts from this blog

banks

Chutneys 🍒🍬🍧🍎🍉🍓🍑🍅🌽🍪🍨🍌🍋🍫🍮🍑🍈